इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाला तात्काळ प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारत इस्रायलकडून शिकेल का ?

जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांनी एकमेकांवर आक्रमण चालू केले आहे. १० मे या दिवशी ‘हमास’ने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होती. याला इस्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात पॅलेस्टाईनचे २० नागरिक ठार झाले आहेत, तर ६५ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. ‘देश मोठ्या सामर्थ्याने प्रत्युत्तर देईल’, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद

इस्रायलने वर्ष १९६७ मध्ये मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम कह्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर ‘यहुदी लोकांचा देश’ म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलच्या विरोधात संघर्ष करत आहेत. आता इस्रायलने जेरूसलेममध्ये रहाणार्‍या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला प्रारंभ केला आहे.