अमेरिकेतील गुप्तचरांच्या हाती लागलेला चीनच्या शास्त्रज्ञांचा अहवाल
कोरोनाचे संकट हे चीनने प्रारंभ केलेले तिसरे महायुद्ध आहे, हे यातून लक्षात येते ! त्यामुळे आता संपूर्ण जगाने संघटित होऊन चीनच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोनाचा संसर्ग भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका दिवसाला ४ लाखांहून अधिक जणांना त्याचा संसर्ग होत आहे, तर ४ सहस्रांहून अधिक जणांचा प्रतिदिन मृत्यू होत आहे. कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट (प्रकार) समोर येत आहेत. त्यात ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि नंतर भारतातील व्हेरिएंट समोर आला आहे. कोरोनाची मूळ उत्पत्ती चीनमध्ये झाली आहे, हे सध्या लोक विसरले आहेत आणि चीनमध्येही याचा प्रभाव केव्हाच ओसरून चीनमध्ये पुन्हा पूर्वीप्रमाणे दळणवळण चालू आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील गुप्तचरांना चीनचा एक अहवाल सापडला आहे. १८ तज्ञांनी लिहिलेल्या या अहवालातून लक्षात आले आहे की, चीन ६ वर्षांपासून तिसर्या महायुद्धासाठी कोरोनासारखे जैविक शस्त्र बनवत होता आणि त्याने प्रत्यक्षात कोरोनाच्या माध्यमातून तिसरे युद्ध चालू केले आहे. असे जैविक शस्त्रच या युद्धाचे मुख्य शस्त्र असणार आहेत.
China discussed weaponising coronaviruses before pandemic, predicted WW3 with bio-weaponshttps://t.co/GO4H5kKlAJ
— Republic (@republic) May 9, 2021
१. या अहवालात म्हटले आहे की, चीननेच वर्ष २०१५ मध्ये सार्स या विषाणूला सैन्याचे एक शस्त्र या दृष्टीनेच सिद्ध केले होते. चीनच्या सैन्याने पूर्वी कधीही पाहिलेले नाही, अशा प्रकारचे जैविक शस्त्र बनवण्याचा उल्लेख केल्याचा दावा यात करण्यात आला आहे.
२. या अहवालात म्हटले आहे की, तिसर्या महायुद्धासाठीच कोरोनासारखे शस्त्र बनवण्यात आल्याने तिचा कोणत्या परिस्थितीत वापर करायचा, ज्यामुळे अधिकाधिक हानी होऊ शकेल, हेही ठरवण्यात आले आहे.
३. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, चिनी शास्त्रज्ञांच्या मते जैविक शस्त्रांचे आक्रमण दिवसा करण्यात येणार नाही; कारण सूर्याच्या प्रकाशामुळे जैविक शस्त्रांचे विषाणू नष्ट होऊ शकतात. जेव्हा पाऊस किंवा बर्फवृष्टी होत असेल, सकाळी किंवा सायंकाळी ढग असतील, तेव्हा हवेच्या दिशेने याचा वापर केला पाहिजे. अशा आक्रमणामुळे रुग्णालयात येणार्या रुग्णांची संख्या वाढेल.
४. ब्रिटनच्या विदेश प्रकरणांच्या समितीचे अध्यक्ष आणि खासदार टॉम टुगेधांत यांनी म्हटले की, आपण कितीही कठोर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, तरी ही शस्त्रे अधिक धोकादायक असतील.