एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे.

पाकचे सैन्य भारतासमोर २४ घंटेही टिकणार नाही !

पाकमधील नेत्यांना हे ठाऊक असूनही तेथील शासनकर्ते भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचे आणि पाकचे सैन्य कुरापती काढण्याचे प्रयत्न करत असतात. ‘भारत आपल्यावर आक्रमण करणार नाही’, असा अपसमज त्याला झाला आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतरही ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका रहातो ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आणि ५० लाख सामान्य रुग्ण यांची तपासणी केली. यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका ५९ टक्के अधिक होता.

चीन सैन्याकडून तिबेटमध्ये नवीन कमांडरची गुपचूप नियुक्ती

चीन विश्वासघातकी असल्याने त्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून भारताने सतर्क रहाणेच योग्य आहे ! चीनने कुरापत केली, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची सिद्धता भारताने केली पाहिजे !

श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी !

भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४० ठार

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्यानंतर या कार्यक्रमासाठी १० सहस्रांहून अधिक जणांनी उपस्थिती दर्शवली होती.

बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !

बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचे नियम पाळले न गेल्याने भारतात परिस्थिती बिघडली ! – जागतिक आरोग्य संघटना

भारतियांना आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शिस्त शिकवली आणि लावली नसल्यामुळेच देशात ही स्थिती निर्माण झाली आहे !

आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.