एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे. एक गोळी घरीच घेतल्यावर कोरोनातून मुक्त होता येऊ शकतो, असा दावा या आस्थापनाकडून केला जात आहे. ‘पीएफ०७३२१३२२’ असे साध्या तिला नाव देण्यात आले आहे.