पाकचे सैन्य भारतासमोर २४ घंटेही टिकणार नाही !

पाकमधील जमीयत उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांचा पाकला घरचा अहेर !

पाकमधील नेत्यांना हे ठाऊक असूनही तेथील शासनकर्ते भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचे आणि पाकचे सैन्य कुरापती काढण्याचे प्रयत्न करत असतात. ‘भारत आपल्यावर आक्रमण करणार नाही’, असा अपसमज त्याला झाला आहे. भारत सरकारने तो तात्काळ दूर करणे आवश्यक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे सैन्य अत्यंत दुर्बळ आहे आणि भारताशी युद्ध झाल्यास त्याच्यासमोर २४ घंटेही टिकणार नाही, असे वक्तव्य पाकमधील जमीयत उलेमा-ए-इस्लाम या राजकीय आणि धार्मिक संघटनेचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी केले. यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. पाक सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी टीका करतांना म्हटले की, मौलाना फजलुर रहमान यांनी अशी टीका करून देशासाठी प्राण देणार्‍या सैनिकांचा अवमान केला आहे.