Per Capita Loan : प्रत्येक भारतियावर आहे १ लाख ४० सहस्त्र रुपयांचे कर्ज !

देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ !

केंद्रशासनाने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. आता हा भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के इतका झाला आहे.

पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल यांची किंमत ३२९ रुपयांहून अधिक !

या व्यतिरिक्त घरगुती सिलिंडरची किंमतही २४६ रुपयांनी वाढल्याने सिलिंडरची किंमत ३ सहस्र ७९ रुपये झाली आहे. 

पाकमधील राजकीय गोंधळ !

पाकिस्‍तानात अजूनही खानदान आणि कबिले यांच्‍यावर राजकारणाचे स्‍वरूप ठरत असते. अशा देशातील जनतेचे अन्‍नाविना हाल झाले, तरी त्‍याचे तेथील राजकीय लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नसते. इम्रान खान यांना शिक्षा केल्‍यावर पाकिस्‍तानात नवा अध्‍याय चालू होईल; पण तो सुडाचा, द्वेषाचा आणि अहितकारी असेल.

अराजकतेच्‍या उंबरठ्यावर ‘पाप’स्‍तान !

पाकिस्‍तानमधील अनेक प्रांतांमध्‍ये उठावासारखी स्‍थिती असून पाकिस्‍तानचे तुकडे होण्‍याचीही शक्‍यता असल्‍याने भारताला या सर्व घडामोडींकडे लक्ष देत सतर्क रहाणे आवश्‍यक आहे. या स्‍थितीचा लाभ उठवत भारताने पाकव्‍याप्‍त काश्‍मीर मुक्‍त करावा. असे झाल्‍यास तो जागतिक स्‍तरावरील मुत्‍सद्देगिरीचा एक उत्‍कृष्‍ट नमुना ठरेल !

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !

मूर्तीकारांच्या मते त्यांना आवश्यक अशी चिकण माती मिळत नाही. मूर्ती बनवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कारागीर मिळत नाहीत. नवीन पिढी या व्यवसायात उतरू पहात नाही. केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

गोमंतकियांना टोमॅटो दरवाढीचा फटका बसणार नाही ! – कृषीमंत्री नाईक 

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला २ किलो टोमॅटो विनामूल्य देण्याची मागणी विधानसभेत केली. या मागणीवर बोलतांना कृषीमंत्री रवि नाईक यांनी ही माहिती दिली.

गोवा : यंदाही अनुदानात वाढ न झाल्यामुळे शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार अप्रसन्न !

स्थानिक हस्तकला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, मग श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी अनुदानात वाढ करण्यास कोणती अडचण ?

गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.