गोमंतकियांना टोमॅटो दरवाढीचा फटका बसणार नाही ! – कृषीमंत्री नाईक 

गोवा विधानसभा अधिवेशन

टोमॅटो दरवाढीचा फटका

पणजी, १८ जुलै (वार्ता.) – देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत; मात्र गोव्याला टोमॅटोच्या दरवाढीचा फटका अधिक बसणार नाही. गोव्यातील फलोत्पादन मंडळ परराज्यातून टोमॅटो आणून ते अल्प दराने गोव्यात विकत आहे. गोव्यात फलोत्पादन मंडळ टोमॅटो १०३ रुपये दराने विकते, तर परराज्यात हाच दर १४० रुपये आहे, अशी माहिती कृषीमंत्री रवि नाईक यांनी सभागृहात दिली.

कृषीमंत्री रवि नाईक

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला २ किलो टोमॅटो विनामूल्य देण्याची मागणी विधानसभेत केली. या मागणीवर बोलतांना कृषीमंत्री रवि नाईक यांनी ही माहिती दिली.