जे दारू पिणार, ते मरणार !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विधान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारले असता ‘लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. काळजी घेतली पाहिजे; कारण जो दारू पिणार, तो मरणारच’, असे विधान केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारने एप्रिल २०१६ पासून राज्यात संपूर्ण दारूबंदी घोषित केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत बिहारमध्ये अनेकवेळा विषारी दारू प्यायल्याने लोकांचे मृत्यू झाले आहेत.

संपादकीय भूमिका

जे लोकांना दारुबंदी असतांना दारू मिळत असतांना निष्क्रीय रहात आहेत, असे शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना काय शिक्षा करायची ?, हे नितीश कुमार सांगतील का ?