नागपूर येथे मद्याच्या नशेत मालवाहतूक बोलेरो चालकाने अनेकांना उडवले !

नागपूर – मद्याच्या नशेत चालकाने भरधाव मालवाहतूक बोलेरो वाहन चालवत भाजीबाजारात अनेकांना उडवले. यात घटनेत ५ भाजी विक्रेते घायाळ झाले आहेत, तर एक दुचाकीचालक २०० मीटर फरफटत गेला. सामाजिक माध्यमांवर याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर ही घटना समोर आली. ४ डिसेंबरच्या सायंकाळी ही घटना घडली. घटनेचे सीसीटीव्हीचे चित्रण समोर आल्यानंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.