म्हापसा, २५ जून (वार्ता.) – कळंगुट येथे बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी काही समाजकंटक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असतात, यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवतो, असे सूत्र उपस्थित केले. गोवा सरकारने पंचायतींना बालग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या अध्यक्षतेखाली बालग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बालग्रामसभेला विविध विद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
Calangute Bal Gram Sabha: कळंगुट पंचायतीचा स्तुत्य उपक्रम; बाल ग्राम सभेतून जाणून घेतल्या मुलांच्या समस्या#calangute #VillagePanchayat #balgramsabha #dainikgomantakhttps://t.co/1FN9LuT1r7
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) June 25, 2023
बालग्रामसभेविषयी अधिक माहिती देतांना सरपंच सिक्वेरा म्हणाले, ‘‘रात्री मद्यप्राशन करून बाटल्या उघड्यावर टाकणे, मैदान सुरक्षित नसणे, काही विद्यालयांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर काही विद्यालयामध्ये फळे (ब्लॅक बोर्ड) अल्प आहेत. काही शाळांमध्ये शौचालयांचा अभाव आहे. अशा विविध समस्या विद्यार्थ्यांनी बालग्रामसभेत मांडल्या.’’ बालग्रामसभेचा संदेश सर्वांपर्यंत पोचलेला नसल्याने ही बालग्रामसभा अर्ध्यावरच बंद करून ती २२ जुलैला ठेवण्यात आली आहे. (पुढील दिनांकापर्यंत तरी शाळांनी आणि पंचायतीने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडवाव्यात ! – संपादक)
(सौजन्य : Goan Reporter News)
संपादकीय भूमिकाजे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते ते पंचायतीला का लक्षात येत नाही ? |