त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली !

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील गड-दुर्ग हे समस्त शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहेत-खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले .

बिबट्याच्या आक्रमणात राजापूर (जि. रत्नागिरी) येथील नायब तहसीलदार दीपाली पंडीत घायाळ

बिबट्या आक्रमण करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारला असून दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकर्‍यांची फसवणूक ! वर्ष १९७५ मध्ये अ‍ॅल्युमिनिअम (BALCO) प्रकल्पासाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकर्‍यांची १२०० एकर भूमी संपादित करण्यात आली; मात्र त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी आस्थापनांना देण्यात आल्या.

गड-दुर्गांवरील अतिक्रमणाच्या विरोधात ३ मार्चला मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ !

अफझलखानाच्या कबरीच्या भोवतालच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली, त्याप्रमाणे अन्य गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्यात यावे. हेही शिवरायांचे कार्य आहे. त्यामुळे धारकर्‍यांनी वेळात वेळ काढून या धर्मकार्यात सहभागी व्हावे.

इतिहासाच्या माध्यमातून सावरकरांचा त्याग समाजासमोर मांडावा ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘ब्रिटीशांनी या कारागृहात सावरकरांचे अधिकाधिक मानसिक खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व योजना आखल्या. अंदमानात या सगळ्या भयानक शिक्षांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.

मंत्री आणि आमदार यांना ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्‍या’त सहभागी होण्‍याविषयी निमंत्रण !

महामोर्च्‍यात सहभागी होण्‍याचे आणि विधीमंडळात विषय उपस्‍थित करण्‍याचे आमदारांचे आश्‍वासन !

खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या मागणीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा तहकूब !

खासदार संजय राऊत यांनी ‘विधीमंडळ चोरमंडळ आहे’, या केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन तसेच ‘मराठी भाषा संवर्धनासाठी लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सरकारने आमच्या जमिनी परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनींचा मोबदला शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाने केली आहे.