गोवा  गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाची ६ प्रकल्पांना अनुमती

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने २८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत गोव्यात  ६ प्रकल्पांना अनुमती दिली. या प्रकल्पाद्वारे राज्यात ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली

ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला होता, तेथे भेट देऊन प्रार्थना करण्याचा मला सन्मान वाटतो.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार !

विधानसभा सदस्यांच्या भावना पंतप्रधानांना सांगून त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यासाठी विनंती करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कार्यवाहीसाठी अडीच कोटी रुपये निधी !

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद येथे वर्ष २०२२-२३ वर्षांच्या ६ सहस्र ७१ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्या वेळी वरील माहिती देण्यात आली.

गडांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे ! – रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनाची ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी गडांचे जतन आणि संवर्धन करण्यास माझ्या शासनाने प्राधान्य दिले आहे- राज्यपाल रमेश बैस

राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

लाच दिल्याविना लोकांची कामे होत नाहीत. १ मास ३ दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. तरीही जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे वितरण केलेले नाही. सरकार तिथे लक्ष देण्यास अल्प पडले आहे- अजित पवार

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआयकडून चौकशी

सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण अन्वेषणात मी पूर्ण सहकार्य करेन. मला काही मास कारागृहात रहावे लागले, तरी मला त्याची काळजी नाही.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर फडकवला खलिस्तानी झेंडा !

ब्रिस्बेन येथील भारताच्या वाणिज्यदूत अर्चना सिंह यांना २२ फेबु्रवारीला कार्यालयात खलिस्तानी झेंडा फडकवलेला दिसून आला. यानंतर त्यांनी त्वरित क्वींसलँड पोलिसांना याची माहिती दिली.

चंद्रपूर येथील जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्‍याचे आदेश !

पूर्वीच्‍या माणिकगड आणि आताच्‍या अल्‍ट्राटेक सिमेंट उद्योग समुहाने कुसुंबी येथील आदिवासींच्‍या भूमींवर ३६ वर्षांपासून अवैध नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप पीडित आदिवासींनी केला आहे.

राज्‍यात वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करण्‍यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.