‘आष्टी’च्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी नेमण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले, पण त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून आष्टी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत ! – उपमुख्यमंत्री

राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असून पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण केले जाईल, तसेच एकाच विषयाचे खटले ३ ठिकाणी असून त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

गोवा : अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारंवार तक्रार करूनही अवैध डोंगर कापणीकडे दुर्लक्ष होणे, ही प्रशासनाची निष्क्रीयता आहे कि त्यांचे अवैध कृत्य करणार्‍यांशी साटेलोटे आहे ?

कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !

कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्क्यांनी वाढ करणार !

कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या नियमितच्या कामांचीही नोंद घेणे आवश्यक असल्याची मागणी विधानसभेत उपस्थित करण्यात आली.

पुरातत्व विभागाची हिंदु विधीज्ञ परिषदेला माहिती राज्य पुरातत्व विभागातील ३०० पैकी १३२ पदे रिक्त !

पुरातत्व विभागातील रिक्त पदे भरण्याविषयी ६ एप्रिल २०२२ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठवले होते.

विशेष समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार !

मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी-सर्वोच्च न्यायालय.