Lakshadweep: लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांसाठी ६ सहस्र कोटी रुपये खर्च करणार !

लक्षद्वीप बेट

कोची (केरळ) – लक्षद्वीप बेटांच्या पर्यटन विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे भारत आणि मालदीव यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत सरकार लक्षद्वीप बेटांवरील पायाभूत सुविधा चांगल्या करण्यासाठी येत्या ५ वर्षांत ६ सहस्र कोटी रुपये खर्च करणार आहे.

यात एका विमानतळाचाही समावेश असणार आहे. हे विमानतळ प्रवासी आणि भारतीय सैन्य दोघांसाठी वापरण्यात येणार आहे.