वाराणसी (उत्तरप्रदेश) – जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील तळघराच्या चाव्या जिल्हाधिकार्यांकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या तळघराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हिंदु पक्षाचे अधिवक्ता मदन मोहन यादव यांनी यापूर्वी सांगितले होते की, सरकारी अधिकार्यांनी १९९३ मध्ये ज्ञानवापीच्या तळघराला कुलूप लावले होते. अधिवक्ता यादव यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला होता की, याआधी पुजारी सोमनाथ व्यास या तळघराचा पूजेसाठी वापर करत होते.