पंतप्रधानांना ‘राजकारणाचे महानायक’ संबोधले !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारतातील प्रसिद्ध बनारस हिंदु विश्वविद्यालयातील नझमा परवीन या मुसलमान विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएच्.डी केली आहे. वाराणसीजवळ असलेल्या लालपूर येथील निवासी नझमा या राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला अध्ययन करण्यासाठी ८ वर्षे लागली. त्यांनी अध्ययनात पंतप्रधानांना ‘राजकारणाचे महानायक’ संबोधले आहे.
‘नरेंद्र मोदी यांचे राजकीय नेतृत्व : एक विश्लेषणात्मक अध्ययन (वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचा विशेष संदर्भ)’ असे या शोध अध्ययनाचे शीर्षक आहे. त्यांनी प्रा. संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे.
परवीन पुढे म्हणाल्या की,
१. पंतप्रधान मोदी हे देशातील विश्वासार्ह नेते आहेत. ते मुसलमानांचे विरोधी नाहीत, तर त्यांचे हितैषी आहेत. तसेच आध्यात्मिक चिंतक आणि समाजसुधारक ही आहेत.
२. मी जेव्हा या विषयावर शोध करण्याचे ठरवले, तेव्हा मला पुष्कळ विरोध झाला होता.
३. या शोध अध्ययनासाठी २० हिंदी, तसेच ७९ इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास केला आहे. यासह ३७ वर्तमानपत्रांचा अभ्यास केला. पंतप्रधानांचे भाऊ पंकज मोदी आणि रा.स्व.संघाचे इंद्रेश कुमार यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.
संपादकीय भूमिकायावरून हिंदुद्वेष्ट्यांनी राजकारण केले नाही, तरच नवल ! |