समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे वादग्रस्त विधान !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘तत्कालीन सरकारने कारसेवकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे दिलेला आदेश योग्य होता’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘तत्कालीन सरकारने कायद्याचे रक्षण करण्यासाठी त्याचे कर्तव्य बजावले होते’, असे मौर्य यांनी म्हटले आहे. ते गणेशपूर येथे बौद्ध एकता समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध जनजागृती परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते.
१. स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, अयोध्येत न्यायव्यवस्था किंवा प्रशासन यांच्या कोणत्याही आदेशाविना कारसेवकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यावर तत्कालीन समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंह सरकारने राज्यघटना आणि कायदा यांचे रक्षण करण्यासाठी कारसेवकांवर गोळीबार केला होता. (अशी तत्परता उत्तरप्रदेशमध्ये दंगली घडवणार्या किंवा आत्मघातकी कारवाया करणार्या धर्मांध मुसलमानांच्या संदर्भात तत्कालीन समाजवादी सरकारने दाखवली होती का ? – संपादक)
२. ३० ऑक्टोबर १९९० या दिवशी पहिल्यांदा कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळी लागल्याने ५ जण ठार झाले होते. गोळीबारानंतर अवघ्या २ दिवसांनी २ नोव्हेंबर या दिवशी सहस्रावधी कारसेवक हनुमान गढीवर पोचले होते. या घटनेनंतर २ वर्षांनी ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|