अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

लेखी आश्‍वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते.

आमदार केसरकर यांच्या आश्‍वासनानंतर रवि जाधव यांचे उपोषण मागे

नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.

कायमस्वरूपी जागा देण्याची रवि जाधव यांची मागणी मान्य करणे शक्य नाही ! – नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे.

येत्या ३० जानेवारीला बेमुदत उपोषण चालू करण्याची अण्णा हजारे यांची घोषणा

केंद्र सरकार दिलेल्या लेखी आश्वासनांच्या कार्यवाहीची घोषणा करत नाही, त्याविना आंदोलन थांबणार नसल्याच्या पवित्र्यात अण्णा हजारे आहेत.

रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी

प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्‍न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !

आमरण उपोषण करणार्‍या खाण कामगारांपैकी दोघांची प्रकृती ढासळली : जिल्हा रुग्णालयात भरती

मागील ११ मासांचे थकीत वेतन मिळण्यासाठी फोंडाघाट येथील चिराग माइन्स आस्थापनाच्या कामगारांचे मागील ४ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे.

अयोग्य पद्धतीने वापर होत असलेल्या देवस्थानांच्या भूमी कह्यात न घेतल्यास उपोषण करणार !

हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.

नंदुरबार येथे ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’च्या वतीने आमरण उपोषणास प्रारंभ !

मृत्यूमुखी पडलेली निष्पाप बालिका हिताक्षी माळी हिच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या नंदुरबार नगरपरिषदेच्या ठेकेदाराचा ठेका रहित करण्याबरोबर अन्य मागण्याही उपोषणार्थींच्याकडून करण्यात आल्या आहेत.

अकोला येथील वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे !

१०० भाविकांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तन यांकरिता अनुमती देण्यात यावी,या मागणीसाठीचे वारकरी संघटनांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.