विविध राजकीय नेत्यांनी दर्शवला उपोषणाला पाठिंबा !
वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – येथील बसस्थानक परिसरातील सरकारमान्य देशी दारूचे दुकान इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी महालगाव ग्रामस्थांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. दुकान दुसर्या ठिकाणी हलवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच उपोषण सोडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या उपोषणाला विविध पक्षांतील राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. (दुकान दुसरीकडे स्थलांतर केले, तरी मद्यपींचा त्रास इतरांना होणारच आहे. त्यामुळे गावात दारू विक्रीचे दुकान न होण्यासाठी सर्वांनी वैधमार्गाने लढा दिला पाहिजे ! – संपादक)
महालगाव येथे बसस्थानक परिसरातील देशी दारू विक्री दुकानासमोर उभ्या असलेल्या मद्यपींमुळे व्यापारी, महिला, विद्यार्थी आणि नागरिक यांना अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. देशी दारूचे दुकान अल्प वर्दळ असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करावे, यासाठी माजी पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका :बसस्थानकाजवळ असणार्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना होणार्या त्रासासाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |