आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुका लढणारच ! – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ‘आमरण उपोषणा’ला ८ जूनपासून प्रारंभ झाला. पोलिसांकडून या उपोषणाला अनुमती नाकारण्यात आली आहे; मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत.

रायगडावर मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ६ जूनपासून आमरण उपोषण करणार ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला गडावरील असुविधा दिसत नाहीत का ?

परळ येथील दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले कलाकारांसह उपोषण करणार !

नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेचा प्रस्ताव

देवगड (सिंधुदुर्ग) : नळपाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्याने साळशी येथे पाणीटंचाई !

मूलभूत सुविधांसाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

गोरक्षकांना मारहाण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित आणि पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

बोदवड (जिल्हा धुळे) येथील गोरक्षक संजय शर्मा यांचे ३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ चालू !

जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.

‘आशा’ स्वयंसेवकाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सरकार आशा स्वयंसेविकांच्या पाठीशी आहे. आर्थिक सूत्रे येतात, तेव्हा त्यामुळे परिणाम होणार्‍या अनेक गोष्टी पहाव्या लागतात. दोघांनी थोडे पुढे-मागे सरले पाहिजे. चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले.

‘सगेसोयरे’ची अधिसूचना लागू झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही ! – मनोज जरांगे पाटील

‘मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे संबंधीच्या अधिसूचनेची कार्यवाही झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम निर्धार मराठा समाजाचे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केला.

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही ! – जरांगे यांची शासनाच्या शिष्टमंडळाला चेतावणी

महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अशी चेतावणी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जरांगे पाटील यांना शासनाचे शिष्टमंडळ भेटायला गेले होते, त्या वेळी त्यांनी ही चेतावणी दिली.