|
धुळे, १४ मार्च (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह बंद करावेत, गोतस्करी रोखावी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून गोरक्षकांना अमानुष वागणूक मिळाल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांना निलंबित करावे, या मागण्यांसाठी धुळे येथील गोरक्षक श्री. संजय शर्मा यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गेल्या ३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ चालू केले आहे.
वरील मागणीच्या अनुषंगाने ११ मार्चला मोर्चा काढण्यात आला; पण प्रशासनाने कारवाई न केल्याने शर्मा यांनी वरील मार्ग निवडला. त्यांनी १२ मार्च या दिवशी अपर पोलीस अधीक्षकांच्या विनंतीवरून केवळ पाणी घेतले. १३ मार्च या दिवशी सकल हिंदु समाज आणि संघटना यांच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यातील नागरिकांनी सायंकाळपर्यंत ठिय्या दिला.
गोरक्षक श्री. संजय शर्मा यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. यात विशेष धुळे जिल्ह्यातील व्हेटर्नरी संघटना यांची उपस्थिती होती. |
अनधिकृत पशूवधगृह उद्ध्वस्त करण्याचे आश्वासन !
आंदोलकांना भेटून चर्चेनंतर नगरपंचायतीने मुख्याधिकारी गजानन तायडे, पशूवैद्यकीय अधिकारी गजानन साखरे, सफाई आणि पोलीस कर्मचारी यांनी शहरातील कसाई वाड्यात जाऊन पहाणी, तसेच व्हिडिओ चित्रीकरणही केले. पशूवधगृह चालू आहेत का ? याची सखोल चौकशी केली; पण त्यांना या वेळी काहीही आढळले नाही. (अनधिकृत पशूवधगृहांची पहाणी अचानक जाऊन करायची असते, हे अधिकार्यांना ठाऊक नाही का ? – संपादक) संशयित असलेल्या ६ पशूवधगृह चालकांना नोटीस देण्यात आली आहे.
संयुक्त प्रतिबंधात्मक कारवाई, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार !
नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन हे अनधिकृत पशूवधगृह आणि गोवंशियांच्या मांसाचा वापर करणार्या उपाहारगृहांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहेत. गोमांस विक्री व्यवसायाच्या उद्देशाने बांधलेले ओटे काढण्यासाठी ३ दिवसांची नोटीस दिली आहे. याप्रमाणे नगरपंचायतीने उघड्यावर गोमांस विक्रीस प्रतिबंध केला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत विषय घेऊन शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येतील. नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.