हिंदु जनसंघर्ष मोर्चा : हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम !

हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.

हिंदुत्‍वाची व्‍यापकता आणि सर्वसमावेशकता जाणा !

जगातील सर्वांत प्राचीन, वैज्ञानिक, मानवतावादी, समतावादी, भूतदयावादी, पर्यावरणवादी, तसेच व्‍यष्‍टी, समष्‍टी, सृष्‍टी आणि परमेष्‍टी यांचा एकाच वेळी समग्रपणे विचार करणार्‍या सनातन धर्माचे आचार, विचार अन् संस्‍कार म्‍हणजे हिंदुत्‍व !

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता.

कॅनडा येथे चारचाकी गाडीच्या चोरीला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची हत्या

टोरंटो येथे चारचाकी वाहनाची चोरी करण्यास विरोध केल्याने गुरविंदर नाथ या २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर आक्रमण करण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी महाविद्यालयातील सुटीच्या काळात पिझ्झा वितरणाचे काम करत होता.

वादग्रस्त ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांच्याकडून क्षमायाचना ! 

‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटात अयोग्य संवादांचे लिखाण केल्याच्या प्रकरणी लेखक मनोज मुंतशीर यांनी क्षमायाचना केली आहे. मुंतशीर यांनी आरंभी श्री हमुमंतांच्या मुखी घातलेल्या वादग्रस्त संवादाचे ठामपणे समर्थन केले होते.

लोक मुसलमानांच्या भेदभावाविषयी का बोलतात ?, हा प्रश्‍न पडतो ! – हुमा कुरेशी, अभिनेत्री

हुमा कुरेशी यांच्या वक्तव्याविषयी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?

मडगाव (गोवा) येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला मदरसा तात्पुरता बंद

रुमडामळ पंचसदस्य वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून वातावरण अशांत झाले होते. श्री. वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती.

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या बंदला व्‍यावसायिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

आंबेगाव तालुका येथील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जून या दिवशी असलेल्‍या मंचर शहर बंदला व्‍यवसायिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. या बंदमधून अत्‍यावश्‍यक सेवा वगळल्‍या होत्‍या.

हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु आणि कार्यकर्ते यांचा कर्नाटक येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांच्याकडून गौरव !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सप्तम दिनी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, समितीच्या आय्.टी. सेलचे समन्वयक श्री. प्रदीप वाडकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता नागेश जोशी यांचा गौरव केला.  

‘आदिपुरुष’ चित्रपटावर बहिष्कार घाला ! – पू. कालीचरण महाराज

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहन पू. कालीचरण महाराज यांनी हिंदु समाजाला केले. या चित्रपटातील भाषा, प्रभु श्रीराम आणि सीता यांचे चित्रण, रावणाच्या संदर्भातील प्रसंग आदींवर हिंदूंनी आक्षेप घेतला आहे.