ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या विरोधात मुसलमान पक्षाकडून अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाविषयी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या याचिका प्रविष्ट करण्यात आली.

या कमिटीने उच्च न्यायालयात न जाता थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिला होता.

तोपर्यंत, म्हणजे २६ जुलैच्या सायंकाळी ५ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला स्थगितीही दिली आहे. २६ जुलैपर्यंत यावर निर्णय घेण्यासही सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे या याचिकेवर २६ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.