हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा  

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे !

‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण मावळे होऊया ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

श्री मारुति मंदिर, पेंजळवाडी, तालुका भोर, पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सभेला एकूण २०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.

शेवटचा श्वास असेपर्यंत मठ, मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करत आहेत, तर दुसरीकडे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होत आहेत. संघटन, साधना या दिशेने मार्गक्रमण करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार होऊया.

Hindu Hatred Congress : (म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र केल्यास त्याचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान होईल !’ – यतिंद्र सिद्धरामय्या

हिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !

HJS Solapur Sabha : मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या..

ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र आघाडीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत !

हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. सरकारी अधिकार्‍यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.

देशाची ‘सेक्युलर’ शब्दामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे देशातील श्रद्धास्थाने, परंपरा यावर आघात केले गेले. ‘परकीय आहे ते चांगले आणि भारतीय म्हणजे टाकाऊ’ अशी भावना जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न झाला.

Indian overseas congress : (म्हणे) ‘हिंदु राष्ट्र हवे कि धर्मनिरपेक्ष स्थिर देश हवा ?, हे जनतेला ठरवावे लागेल !’ – सॅम पित्रोदा

वर्ष २०२४ च्या निवडणुका भारताच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतियांना हिंदु राष्ट्र हव आहे कि सर्वसमावेशी आणि स्थिर धर्मनिरपेक्ष देश हवा आहे ? हे ठरवावे लागेल, असे विधान ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.