वर्ष २०३५ पूर्वी भारताला हिंदु राष्ट्र बनण्याचे प्रयत्न !

प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्र सनातन धर्माच्या शिक्षणानुसार असले पाहिजे. समाज सनातन धर्मानुसार वागला पाहिजे. हे तेव्हा होईल, जेव्हा व्यवस्था सनातन धर्मानुसार असेल. देशाचे विभाजन झाले, तेव्हा इस्लामी पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याच वेळी भारत ‘हिंदु राष्ट्र’व्हायला हवा होता. तसे झाले नाही. तेथेच आपली फसवणूक झाली. हा भेदभाव दूर करण्यासाठी वर्ष २०३५ पूर्वी भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोक आता हळूहळू जागृत होत आहेत. पूर्वी लोकांना हिंदु राष्ट्राविषयी बोलण्यास भीती वाटायची, ती आता वाटत नाही. २५ जानेवारीपासून कुंभमेळ्यात १०८ ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात येईल. या कुंभमेळ्यात १०० टक्के हिंदूच येणार आहेत. तेव्हा समजेल किती जणांना हिंदु राष्ट्र हवे आहे ? आणि किती जणांना नको ? एक अर्ज लोकांकडून भरून घेण्यात येईल, त्याचप्रमाणे स्वाक्षरी अभियान राबवून सरकारकडे अर्ज पाठवण्यात येतील, अशी माहिती ‘काली सेने’चे प्रमुख प.पू. आनंद स्वरूप महाराज यांनी दिली.
प.पू. आनंद स्वरूप महाराज पुढे म्हणाले की, जेव्हा महंमद घोरीने पृथ्वीराज चौहान यांना ठार मारले, तेव्हा एक सेना निर्माण झाली, तिचे नाव आवाहन आखाडा. आता अशीच एका भक्कम सेनेची आवश्यकता आहे. आम्ही काली सेनेच्या माध्यमातून काम करत आहोत. जर आपल्याकडे सेना असती, तर ती हिंदूंवरील अत्याचार त्वरित थांबवू शकली असती. लँड जिहाद, लव्ह जिहाद रोखू शकले असते. काली सेना पुढे हेच कार्य करणार आहे. हिंदूंनी आता हिंदु राष्ट्रासाठी एकजूट व्हावे, हिंदूंनी त्यांची संख्याही वाढवावी, असे मी हिंदूंना आवाहन करतो.
इस्लामी आणि खलिस्तानी यांच्याकडून सातत्याने धमक्या !
हिंदु राष्ट्राचे कार्य करत असल्यामुळे मला आतापर्यंत अनेक धमक्या आल्या आहेत. ‘के२’ हे खलिस्तान्यांचे संघटन आहे, त्यांच्याकडून आताच धमकी मिळाली आहे. अशा धमक्या येत असतात. तरी कार्य थांबणार नाही