प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज : ४० किलो वजनाचे ३३ सहस्र रुद्राक्ष शरीरावर धारण करणारे मौनीबाबा महाकुंभपर्वात आले आहेत. मौनीबाबा ५१ कोटी ५१ लाख रुद्राक्ष कुंभक्षेत्री घेऊन आले होते. संकल्पपूर्तीसाठी रुद्राक्षांचा वापर करून त्यांनी १२ ज्योर्तिलिंगांची निमिर्ती केली आहे. अयोध्येप्रमाणे काशी आणि मथुरा येथेही भव्य मंदिरे उभारावी, बांगलादेशमध्ये होणारा हिंदूंचा नरसंहार थांबावा, आतंकवाद संपावा, स्री-भ्रूण हत्या बंद व्हावी, भारतीय सैन्य अधिक सक्षम व्हावे, या संकल्पांसह १० सहस्र गावांना प्रदक्षिणा घालून मौनीबाबा प्रयागराज येथे आले आहेत.

भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे आहे !![]() १२ ज्योर्तिलिंगांची निमिर्ती केल्यानंतर मौनीबाबा म्हणाले, ‘‘रुद्राक्षाद्वारे बनवलेल्या ज्योर्तिलिंगांचे दिव्यदर्शन आता संपूर्ण विश्वाला होईल. देशाला वाचवायचे आहे, देशाला सजवायचे आहे आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवायचे आहे.’’ |