हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही हरतर्‍हेचे प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध यांनी केले.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे वैधमार्गाने प्रयत्न यांवर केंद्रीभूत !

मंदिरमुक्ती अभियान, हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे !  केवळ अयोध्येतील राममंदिरच नाही, तर काशी-मथुरा-भोजशाळा यांसारख्या सर्वच इस्लामी अतिक्रमणग्रस्त मंदिरांच्या मुक्तीसाठी हे अधिवेशन कटीबद्ध असेल.

सरकारी भूमीवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

सर्व जिहादमधील सर्वांत धोकादायक ‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) आहे, तसेच या जिहादशी सर्व जिहाद संबंधित आहेत. याअंतर्गत ते अधिकांश सरकारी भूमी कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करतात.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते.

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर, संपादिका, मानुषी, देहली

कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्‍ता याचा अपलाभ उठवून निष्‍पाप हिंदूंना फसवण्‍याचे काम करत आहेत.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव सहावा दिवस (२९ जून) :  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध संघटना आणि युवक यांनी केलेला संघर्ष

वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. ‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ?

भारतासाठी क्रिकेट धर्म असला, तरी पाकिस्‍तानसाठी तो ‘क्रिकेट जिहादच आहे ! – अधिवक्‍ता विनीत जिंदाल, उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालय

वर्ष १९७८ मध्‍ये भारत-पाकिस्‍तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्‍ही हिंदूंना हरवले’, असे म्‍हटले होते.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस – सत्र : अधिवक्‍त्‍यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष

गुरूंचा आशीर्वाद असल्‍याने हे कार्य यशस्‍वी होत आहे. समाज आणि राष्‍ट्र यांच्‍या हिताचे हे कार्य आपण निर्भिडपणे केले पाहिजे. यासाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श आपल्‍या समोर ठेवला पाहिजे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्कृती रक्षणाचे प्रयत्न

श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये प्राप्त झालेले पैसे, दागिने यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार आणि विश्वस्त यांनी संगनमताने देवनिधीची लूट केली. तुळजापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केल्यावर सरकारने सी.आय.डी.द्वारे अन्वेषण चालू केले.