
पुणे, २४ जून – महापालिकेच्या मिळकत कर आकारणी विभागाकडून ३१ मार्चपर्यंत रोख रक्कम, धनादेश, ‘ऑनलाईन’ आणि ‘डिमांड ड्राफ्ट’ यांद्वारे मिळकतकराचे संकलन केले जाते. या वर्षी एका नागरिकाने ‘आयसीआयसी बँक’, इंडसइंड बँक, ‘जना स्मॉल फायनान्स बँक’ या अधिकोषाच्या नावाने २ कोटी ५७ लक्ष रुपयांचे बनावट ‘डिमांड ड्राफ्ट’ नागरी सुविधा केंद्रात जमा केले. हे ‘डिमांड ड्राफ्ट’ बनावट असल्याची माहिती ‘आयसीआयसी बँक’ने महापालिकेस दिली. संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याने गुन्हा नोंद केला आहे. महापालिकेने नागरी सुविधा केंद्राचे उत्तरदायित्व असलेल्या ‘विदर्भ इन्फोटेक प्रा. लि.’ या आस्थापनाकडे खुलासा मागितला आहे. या घटनेत आस्थापन दोषी आढळल्यास कारवाई होणार असल्याची माहिती कर आकारणी विभागाचे रवी पवार यांनी सांगितले. याच काळात, महापालिकेच्या ‘सर्व्हर’ (मुख्य माहिती कक्ष) खोलीतून शासकीय माहिती असलेली ‘हार्ड डिस्क’ चोरीला गेली आहे. नागरीकांनी अधिकृत माध्यमांचा वापर करूनच कर भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !