
सातारा, २४ जून (वार्ता.) – सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने संमत करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून २८ लाख ५० सहस्र ९५० रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी’तून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागांतर्गत विविध कामांना मान्यता देण्यात आली होती. यामध्ये माण तालुक्यातील काही गावांच्या पाझर तलाव आणि ग्राम तलाव दुरुस्तीची कामे समाविष्ट होती. या कामासाठी न्यूनतम दर देणारे ठेकेदार म्हणून निवड झाल्यानंतर शासनाकडे जमा करायची सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव प्रत्यक्षात न भरता बँकेचा बनावट ‘रिसिव्हड’ शिक्का, रोखपालाची बनावट स्वाक्षरी इत्यादी करून चलने सिद्ध करण्यात आली, असा आरोप आहे. याविषयी बनावट चलने करणारे योगेश रवींद्र बर्गे आणि विजय बापूसाहेब घाडगे यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद कर्मचारी अरुणकुमार दिलपाक यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !