
मुंबई – सरकारने निश्चित करून दिलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणार्या राज्यातील ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ ते मे २०२६ या १४ महिन्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागाने एकूण ५१ सहस्र १०४ वाहनांची पडताळणी केली होती. दोषी आढळलेल्या वाहनांकडून ४६१ लाख ११ सहस्र रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. २४ जून या दिवशी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरामध्ये परिवहन विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रवाशांची अवैध वाहतूक करणार्या ११ सहस्र १४० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४३२ कोटी ७६ सहस्र रुपये वसूल करण्यात आले आहेत.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’