
मुंबई – जंगलात लागणारे वणवे आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध देशांतील कार्यपद्धती यांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील वन विभागाच्या ४ अधिकार्यांचे पथक तेथे पाठवण्याचा मानस आहे. राज्यातील खासगी मालकी असणार्या भूमीत लागणार्या वणव्यामुळे होणारी हानी, त्याची हानीभरपाई यासंदर्भात संबंधित विभाग आणि मंत्री यांच्यासह बैठक घेतली जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी याविषयी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, शिवसेनेचे दिलीप लांडे, ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी सहभाग घेतला होता.
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !