
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदु समाजाला ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यापासून सावध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जून या दिवशी सायंकाळी ५.३० जिव्हाजी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये उपस्थितांना या विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी अन् श्री. महेंद्र अहिरे यांनी इचलकरंजी येथील पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, ‘आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद ओजस्विनी’च्या जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पोळ, शिवसेना जिल्हा संघटक श्री. मोहन मालवणकर, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, उद्योजक श्री. दिलीप पटेल, हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंदा मकोटे उपस्थित होते.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath