
चिपळूण, २४ जून (वार्ता.) – आज उच्चशिक्षित वर्ग असलेल्या ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात धर्मांतर करण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे. केवळ शहर नव्हे, तर खेड्यातील हिंदु युवतींनाही त्या शिक्षण घेत असलेल्या ठिकाणी अथवा काम करत असतांना अशा जिहादी प्रवृत्तींच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी युवतींनी स्वतःच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह समवेतच्या व्यक्तींचे निरीक्षणही केले पाहिजे आणि सतर्क रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सहसंयोजक श्री. अनुराग उतेकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून चिपळूण येथे ‘कॉर्पोरेट जिहाद’विषयी संवाद घेण्यात आला होता. त्या वेळी हिंदु युवती आणि युवक यांना या धर्मांध प्रवृत्तींपासून स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी ‘हर घर योद्धा प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात १० ते १९ जून या कालावधीत पार पडले. १९ जूनला शिबिराची सांगता झाली. या शिबिराचा लाभ चिपळूण तालुक्यातील युवक-युवतींनी घेतला. शिबिरार्थिंनी कराटे, लाठी आणि दंडसाखळी प्रात्यक्षिके सादर केली. ज्या धर्मप्रेमी युवांनी शिबिरात स्वसंरक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, त्यांना श्री. अनुराग उतेकर आणि श्री. प्रशांत उतेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
या वेळी श्री. प्रशांत ऊतेकर यांनी चिपळूण परिसरात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे वाढत असल्याचे सांगून काही प्रमुख घटना सांगितल्या. सनातन संस्थेचे श्री. विनायक कांगणे यांनी शारीरिक बलासह आत्मबल वाढण्यासाठी, तसेच कार्याला ईश्वरी अधिष्ठान मिळावे, यासाठी साधना करण्याचे महत्त्व सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय प्रथमोपचार सेविका डॉ. (सौ.) साधना जरळी यांचेही मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन कु. दिव्या घाग यांनी केले.
अभिप्राय
१. कु. मृण्मयी ओक : मला लाठी-काठी शिकायचे होते, ते या शिबिरामुळे शक्य झाले.
२. श्री. अदित्य तांबे : प्रशिक्षण स्वतः शिकून इतरांनाही शिकवीन.
३. डॉ. (सौ.) अवंति गौंड : असे शिबिर नियमित झाले पाहिजे. महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन नियमित सराव केला, तरच आत्मविश्वास वाढेल आणि कठीण परिस्थितीत प्रतिकार करता येईल.
४. श्री. विनोद शिंदे (पालक) : सर्व हिंदूंनी योद्धा बनण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.
५. श्री. विनित सिनकर : शिबिरात बल वाढल्याचा अनुभव आला.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !