
पुणे – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा पुण्यामध्ये ९ आणि १० जुलै या दिवशी मुक्कामी असणार आहे. त्यासाठी पुण्यातील पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथील लगत आणि पलीकडील बाजूच्या मिळकती जागा कह्यात घेऊन या वर्षी अनुमाने ८ सहस्र चौरस फूट जागा श्रींच्या पालखी मुक्कामासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानाचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांनी दिली. या संदर्भातील जागा कह्यात घेऊन तेथील इमारत पाडकाम अंतिम टप्प्यात आहे.
भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो; पण गेल्या काही वर्षांत वाढलेली गर्दी आणि अन्य कारणांमुळे ही जागा अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाचा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम शहरात इतरत्र स्थलांतरीत करण्याचा विचार चालू होता. त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटले होते आणि याला विरोध झाला होता. त्यामुळे या परिसरात मोठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने येथील अतिक्रमण आणि अवैध बांधकामांवर कारवाई केली, तसेच मंदिराच्या शेजारची ५ गुंठे जागा ताब्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले.
जागा मालकांसोबत बैठका घेऊन ४ कोटी ३० लाख रुपयांचा मोबदला देऊन ही जागा गेल्या आठवड्यात कह्यात घेण्यात आली. आता २ दिवसांपासून ही जागा रिकामी करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.
| ही जागा कह्यात घेतल्यामुळे सोहळ्यात भाविकांसह स्थानिक पुणेकर नागरिकांना विविध सेवा सुविधा देतांना गैरसोयी दूर होतील.
– विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांतीनाथ |
अनधिकृत आणि जुनी बांधकामे पाडण्याच्या कामाला प्रारंभ !
पुणे महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर परिसरातील अनधिकृत आणि जुनी बांधकामे पाडण्याच्या कामाला प्रारंभ झाला. या जागेवर वारकर्यांसाठी अधिक प्रशस्त, सुरक्षित आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त असा आधुनिक पालखी विसावा परिसर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
भिमाले यांच्या माहितीनुसार मंदिर परिसरातील जुनी बांधकामे हटवून त्या ठिकाणी वारकर्यांचा निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीसाठी सभागृह आणि सुरक्षित मार्गिका यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संतांच्या पालखीला साजेसा सन्मान आणि वारकर्यांच्या सेवेला प्राधान्य देणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कामाच्या शुभारंभ प्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले, नगरसेवक विशाल धनवडे, उपायुक्त माधव जागताप, महापालिकेचे अधिकारी आणि मंदिर देवस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने यंदाच्या वारीपूर्वी कामाचा मोठा भाग पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !