
मुंबई – मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘युनिसेफ’ या जागतिक संघटनेने भारतातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याची चेतावणी दिली आहे. महाराष्ट्रातही अयोग्य आहारपद्धत, भ्रमणभाषचा अतीवापर, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २४ जून या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात देण्यात आली.
‘युनिसेफ’च्या वर्ष २०२५ च्या अहवालानुसार जगभरात ५ ते १९ वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ९.४ टक्क्यांनी वाढले आहे. हा धोका भारतामध्येही निर्माण झाल्याचे ‘युनिसेफ’ने सांगितले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलांच्या लठ्ठपणाचा धोका महाराष्ट्रातही वाढत असल्याचे लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी