इस्‍लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्‍त्‍या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो.

हिजाबला विरोध केल्यावरून इराणमध्ये ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीला अटक

इराणमध्ये हिजाबला विरोध केल्यावरून इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदोस्ती यांना तेहरान येथे सुरक्षादलांनी अटक केली. अलीदोस्ती यांनी हिजाबबंदीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार्‍या नागरिकांच्या हत्येवर टीका केली होती.

माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, तर उत्सव साजरा करा ! – तरुणाची अंतिम इच्छा

तेहरानच्या न्यायालयाने मजीदरोजा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. हिजाबविरोधी आंदोनाच्या वेळी दोघा पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप होता. 

राज्यघटनेची शपथ घेणारी कोणतीही व्यक्ती कधीही समान नागरी कायद्याला विरोध करणार नाही !  

राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते.

मंगळुरू (कर्नाटक) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात मुसलमान विद्यार्थ्यांकडून बुरखा घालून नाच !

सेंट जोसेफ अभियांत्रिकी महाविद्यालयात काही मुसलमान विद्यार्थ्यांनी बुरखा घालून नाच केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर महाविद्यालयाने ४ विद्यार्थ्यांना निलंबित केले.

‘नैतिक पोलीस’ (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्याची सरकारची घोषणा

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला यश मिळाले आहे. इराणच्या सरकारने नैतिक पोलीसगिरी (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत इराणचा पराभव झाल्यानंतर इराणी नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा !

यावरून इराणच्या नागरिकांचा हिजाबला किती विरोध आहे, हेच लक्षात येते ! भारतातील हिजाबप्रेमी याविषयी काही बोलतील का ?

बंगालमध्ये एका शाळेत हिजाब आणि भगवे वस्त्र यांवरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी !

या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या सैनिक यांना तैनात करण्यात आले. यामुळे शाळेच्या अधिकार्‍यांना बोर्डाची पूर्वपरीक्षा रहित करावी लागली.

हिजाबविरोधी खेळाडू !

इराणी फुटबॉलपटूंकडून भारतीय क्रिकेटपटूंनी बोध घ्यावा ! ‘विविध देशांमध्ये खेळतांना देशाचे प्रतिनिधित्व करणे’ एवढ्यापुरते मर्यादित न रहाता एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःची भूमिका बजावणे आवश्यक आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

इराणच्या संघाने हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ सामन्यापूर्वी मैदानात राष्ट्रगीत गायले नाही !

कुठे हिजाबचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करणारा इराणचा फुटबॉल संघ, तर कुठे हिजाबचे समर्थन करणारे भारतातील तथाकथित निधर्मीवादी !