फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत इराणचा पराभव झाल्यानंतर इराणी नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा !

हिजाबविरोधी आंदोलनाचे प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

दोहा (कतार) – येथील चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत अमेरिकेने इराणच्या संघाचा पराभव केल्यानंतर अमेरिकेच्या नव्हे, तर इराणच्याच नागरिकांकडून स्वतःच्याच देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांनी रस्त्यावर येऊन नृत्य करत या पराभवाचा आनंद साजरा केला. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.

गेल्या काही मासांपासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालू आहे. या आंदोलनात सहभागी लोकांकडून ‘या स्पर्धेसाठी इराणच्या संघाला पाठवू नये’, अशी मागणी करण्यात येत होती. तरीही सरकारने संघ पाठवला होता. या संघाने पहिल्या सामन्याच्या वेळी राष्ट्रगीत न गाता हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता; मात्र नंतरच्या सामन्यात या संघाने राष्ट्रगीत गायल्याने इराणी नागरिक अप्रसन्न होते. आता संघाचा पराभव झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका 

यावरून इराणच्या नागरिकांचा हिजाबला किती विरोध आहे, हेच लक्षात येते ! भारतातील हिजाबप्रेमी याविषयी काही बोलतील का ?