हिजाबला विरोध केल्यावरून इराणमध्ये ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीला अटक

इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदोस्ती

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबला विरोध केल्यावरून इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदोस्ती यांना तेहरान येथे सुरक्षादलांनी अटक केली. अलीदोस्ती यांनी हिजाबबंदीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार्‍या नागरिकांच्या हत्येवर टीका केली होती. त्यासाठी त्यांनी सामाजिक माध्यमांवर मजकूरही प्रसारित केला होता. इराण सरकारने अलीदोस्ती यांच्यावर लोकभावना भडकवल्याचा आरोप केला आहे.
अलीदोस्ती यांना ‘द सेल्समॅन’ या चित्रपटासाठी वर्ष २०१६चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. सध्या त्यांचे इन्स्टाग्राम खाते बंद करण्यात आले आहे. अलीदोस्ती यांचे वडील हामिद हे इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघात होते आणि विदेशी संघांसाठी खेळणारे पहिले इराणी खेळाडू होते.