इराणच्या संघाने हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ सामन्यापूर्वी मैदानात राष्ट्रगीत गायले नाही !

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले  वस्त्र)

दोहा (कतार) – येथे २० नोव्हेंबरपासून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा चालू झाली आहे. येथे खलिफा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये इंग्लंड आणि इराण यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंनी त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत गायले नाही. मैदानामध्ये जेव्हा इराणचे राष्ट्रगीत चालू झाले, तेव्हा इराणी खेळाडू निमूटपणे उभे होते. त्यांनी इराणमध्ये चालू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी असे केल्याचे सांगितले. सप्टेंबर २०२२ मध्ये इराणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणीला हिजाब न घातल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलीस कोठडीत असतांनाच त्या तरुणीचा मृत्यू झाला. याच घटनेचा निषेध म्हणून इराणच्या संघाने राष्ट्रगीत गायले नाही.

संपादकीय भूमिका

कुठे हिजाबचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करणारा इराणचा फुटबॉल संघ, तर कुठे हिजाबचे समर्थन करणारे भारतातील तथाकथित निधर्मीवादी !