माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, तर उत्सव साजरा करा ! – तरुणाची अंतिम इच्छा

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनातील तरुणाला देण्यात आली फाशी !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

मजीदरोजा रहनवर्ड – आपली अंतिम इच्छा व्यक्त करतांना

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनामुळे मजीदरोजा रहनवर्ड या २३ वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली. त्याचा यापूर्वीचा एक व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधण्यात आली आहे. त्याच्या शेजारी २ सुरक्षारक्षक दिसत आहेत. या व्हिडिओतून त्याने व्यक्त केलेली इच्छा ही त्याची शेवटची इच्छा असल्याचे समजले जात आहे. यात तो म्हणतो, ‘कुणीही कुराण वाचू नका. माझ्या मृत्यूनंतर कुणी दुःखी व्हावे, असे मला वाटत नाही. कोणत्याही प्रकारची प्रार्थना करू नका. सर्वांनी माझ्या मृत्यूचा उत्सव साजरा करावा, गाणी वाजवावी आणि खुश रहावे.’

१. बेल्जियमच्या एका खासदाराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी मजीदरोजा याच्या मृत्यूला शरीयत कायदा उत्तरदायी असल्याचे म्हटले आहे. त्याने त्याच्या अधिकारांसाठी आवाज उठवला होता. शरीयत कायद्यानुसार अल्लाच्या माध्यमातून सांग्ण्यात आलेल्या कायद्यांच्या विरोधात असणार्‍यांना शिक्षा दिली जाते.

२. तेहरानच्या न्यायालयाने मजीदरोजा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. हिजाबविरोधी आंदोनाच्या वेळी दोघा पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप होता.