काही मासांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश करणार्या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही ? भारतातील आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो. एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाबचे समर्थन करणारे आता कुठे आहेत ? (ऑक्टोबर २०२२)