उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. चिरंत वि.टी. हा या पिढीतील एक आहे !
९.१.२०२५ या दिवशी (पौष शुक्ल पक्ष दशमी) कु. चिरंत वि.टी. याचा १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. दीपा तिलक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. चिरंत वि.टी. याला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. इतरांचा विचार करणे
‘एकदा मला मंगळुरू येथे शिबिराला जायचे होते. तिथे पुष्कळ उष्णता असते आणि मला उष्णता सहन होत नाही; म्हणून चिरंतने इतरांकडून शिकून घेऊन एक लहानसा ‘बॅटरी’वर चालणारा पंखा मला सिद्ध करून दिला. तेव्हा तो १० वर्षांचा होता.
२. शिकण्याची वृत्ती असणे
माझे सासू-सासरे वयस्कर असल्याने मला घरून बाहेर जायचे झाल्यास स्वयंपाक बनवण्यासाठीची पुष्कळ सिद्धता करून जावे लागते. एकदा मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शिबिराला जायचे होते. त्यापूर्वी मी चिरंतला भात आणि डोसे बनवायला शिकवले होते. मी शिबिराला गेल्यानंतर पाचही दिवस त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व केले.
३. स्वीकारण्याची वृत्ती असणे
कु. चिरंतला त्याची चूक लक्षात आणून दिल्यावर तो ती चूक स्वीकारतो. आरंभी थोडे समर्थन करतो. नंतर ‘तुम्ही सदैव माझ्या चांगल्यासाठीच सांगत आहात; म्हणून मी स्वीकारतो’,असे तो म्हणतो.
४. कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’विषयी विशेष आदर असणे
एकदा चिरंतच्या वडिलांनी त्याला कन्नड वाचायला सांगितले. त्यासाठी त्यांनी इतर वर्तमानपत्रेही दिली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचतो. त्यामुळे मला चैतन्यही मिळेल.’’ त्या वेळी त्याने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचले.
५. साधनेची आवड असणे
माझ्या आईच्या घरी कुणीगल येथे सुटीत गेल्यानंतर माझी मोठी बहीण आणि लहान भाऊ यांची मुले एकत्र बसून नामजप करतात. ‘आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही’, असे मुलांचे संभाषण चालू असते. पुढच्या वेळी सुटीत येतांना ‘चांगली व्यष्टी करूया’, असा संकल्पही मुले करतात.
६. संतांप्रती असलेला भाव
६ अ. पू. रमानंद गौडा
१. एकदा पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. अण्णांची) यांची निवासव्यवस्था आमच्या घरी होती. तेव्हा ‘पू. अण्णा आमच्या घरी वास्तव्यास आहेत, हे आमचे भाग्य आहे’, असे तो म्हणत होता. तेव्हा तो पुनःपुन्हा ‘‘आणखीन काय करू ?’’, असे मला विचारत होता.
२. पू. अण्णांच्या संदर्भात चिरंतचा विशेष भाव आहे. ‘पू. अण्णांनी सांगितलेले सर्व योग्य असते आणि त्यांनी सांगितलेलेच करायचे’, असे त्याला वाटते. एकदा पू. अण्णांनी त्याला नामजप करायला सांगितला होता. त्याने त्यांनी करायला सांगितलेला नामजप पूर्ण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.
६ आ. पू. वामन राजंदेकर : एकदा सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर आमच्या घरी आले होते. तेव्हा चिरंतची पुष्कळ भावजागृती होऊन त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू आले.
६ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले : चिरंतला लहानपणापासूनच साधना पुष्कळ महत्त्वाची वाटते. ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) म्हणजे सर्वोत्तम !’, अशी त्याची श्रद्धा आहे. ‘गुरुदेवांना सर्व ठाऊक असते’, असे तो नेहमी सांगतो. ‘देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहेत’, असे त्याला वाटते.
– सौ. दीपा तिलक (चिरंतची आई), मरडीयुरु, जिल्हा मैसुरू, कर्नाटक. (३०.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.