कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो ! – संशोधन
कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
कोरोना विषाणू हवेत ३ घंट्यांपर्यंत जिवंत राहू शकतो, असे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
कोरोना इतक्या झपाट्याने पसरतो आहे की, त्याच्या विरोधात संरक्षक नीती न वापरता आपण आक्रमक नीती वापरायला हवी. कोरोनाला हरवता येऊ शकते; पण त्याच्याशी लढण्यासाठी फूटबॉल खेळाच्या सामन्याला जशी नीती वापरतो, तशी रणनीती वापरावी लागेल
अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत युरोपपेक्षा अमेरिकेत अधिक रुग्ण आढळून येतील, असे अनुमान जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवले आहे……
चीनमध्ये कोरोनामुळे १४ वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिकेत १२ वर्षांची एक मुलगी ‘व्हेंटिलेटर’वर आहे…….
२ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे.
काही आधुनिक वैद्य आणि खासगी रुग्णालये त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये येणार्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने कोरोना ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.
कोरोनाचे शहरातील पहिले रुग्ण ठरलेल्या दांपत्याची दुसरी चाचणीही ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना रुग्णालयातून २५ मार्चला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ९ मार्चला नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन केले गेले.
‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्ती दायित्वशून्यपणे घराबाहेर पडत असल्याच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने पुढचे पाऊल म्हणून ‘होम क्वारंटाईन’ व्यक्तींच्या घराच्या दारावर पत्रक लावण्याचा निर्णय घेतला आहे.