राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई – २ दिवसांत राज्यात कोरोनाचे २५ रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १२२ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले की, २३ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९७ होती. २४ मार्च या दिवशी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोचली. संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ इतकी झाली. २५ मार्च या दिवशी आणखी ९ रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य असून अन्य ४ कोरोनाबाधित व्यक्ती मुंबईत आढळल्या आहेत. दुपारनंतर ६ रुग्ण आढळले. महाराष्ट्रासाठी हे चिंताजनक आहे. घाबरून जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा.