कोरोनाविषयीची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे. +९१२०२६१२७३९४ या क्रमांकावर राज्यातील सर्व नागरिकांना ही माहिती मिळणार आहे. सध्या इंग्रजी भाषेत ही माहिती मिळेल; मात्र लवकरच ही माहिती मराठीत देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली.