
‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी केलेल्या एका प्रयोगाच्या वेळी कक्षातील सर्व दिवे बंद करून केवळ विजेरीचा मंद प्रकाश ठेवण्यात आला होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यापासून साधारण ३ मीटर अंतरावर असलेल्या काळ्या पडद्याच्या दिशेने हात केल्यावर मला ‘त्यांच्या हाताच्या सर्व बोटांतून काहीतरी बाहेर निघत आहे’, असे अस्पष्टपणे दिसले. नंतर मला ‘त्या बोटांतून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसले. काही क्षणांनी ‘त्यांच्या बोटांतून साधारण ३० सें.मी. अंतरापर्यंत विजेरीच्या प्रकाशझोताप्रमाणे प्रकाशझोत बाहेर पडत आहे’, असे मला दिसले.’
– सौ. विजयलक्ष्मी ब. आमाती, फोंडा, गोवा.
(‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अध्यात्मातील ‘परात्पर गुरु’ या सर्वाेच्च पदावर आहेत. साधनेमुळे त्यांच्या संपूर्ण देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे सातत्याने प्रक्षेपित होत असतात. प्रत्येक पंचतत्त्वामुळे विशिष्ट अनुभूती येतात. पंचतत्त्वांपैकी तेजतत्त्वामुळे ‘डोळे चमकदार दिसणे, चेहरा तेजस्वी दिसणे आणि देहातून प्रकाश बाहेर पडतांना जाणवणे’, या अनुभूती येतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बोटांतून प्रक्षेपित होत असलेल्या तेजतत्त्वरूपी प्रकाशामुळे साधिकेला ही अनुभूती आली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या प्रकाशामुळे काळ्या पडद्याचा काळपटपणा न्यून होतांना दिसतो का ?’, याची अनुभूती साधकांना घेण्यासाठीच हा प्रयोग करण्यात आला होता.’ – संकलक)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |