महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाची तत्कालीन पोलीस महासंचालकांना नोटीस

आंतकवादविरोधी पथकाकडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे वर्ष २०१८ मध्ये एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.

५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले यांना अटक

अटक झाल्यानंतर वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहातात आणि प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत संबंधित शासकीय चाकरीचा लाभ घेत रहातात. त्यामुळे जोपर्यंत तात्काळ निकाल आणि कठोर शिक्षेची तरतूद होत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा घालणे हा एक फार्सच ठरत आहे

अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील निलंबित !

रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले.

मोतिहारी (बिहार) येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणारे दोघे अटकेत, तर ५ जण पसार  

आरोपींना साहाय्य केल्याच्या प्रकरणी पोलीस ठाणे अंमलदार निलंबित : अशांना निलंबित नाही, तर बडतर्फ करून कारागृहात डांबून त्यांनाही आरोपींना देण्यात येईल, तशी कठोर शिक्षा केली पाहिजे !

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील धर्मांध महिलांचा अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात मोठा सहभाग

जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्‍या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !

राज्य राखीव पोलीस दल (बल) आणि तेथे चालणारे अपप्रकार !

पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

अंबिवली (जिल्हा ठाणे) येथे आरोपीला घेऊन जाणार्‍या पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण : ३ पोलीस घायाळ

गुंडांचे आक्रमण झाल्यावर स्वतःच्या सहकार्‍यांना वार्‍यावर सोडणारे पोलीस ! असे पोलीस कधी गुंडांपासून जनतेला वाचवतील का ? सरकारने अशा पळपुट्या पोलिसांना सेवामुक्तच केले पाहिजे !

अश्‍लील शिवीगाळ करणारा धर्मांध जमादार निलंबित !

आैंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे यात्राकाळात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणारे जमादार मिर हिदायत अली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

कळंबा कारागृहातील पोलीस शिपायाकडून बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी

अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !

गैरव्यवहार केल्याप्रकरणी परभणी येथील ३ पोलीस कर्मचारी निलंबित

गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे कर्तव्य पोलिसांवर असतांना अशा विविध गुन्ह्यांत पोलिसांचाच सहभाग असणे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद आहे.