उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ दिवसांच्या गोवा भेटीवर

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे २७ ऑक्टोबरला गोव्यात आगमन झाले असून ते ४ दिवस गोव्यात वास्तव्य करणार आहेत. या दौर्‍यात त्यांच्या हस्ते संत सोहिरोबानाथ आंबिये कला आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या नवीन जागेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

सावरगाळ, दाभाळ येथील सोमनाथ इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

गोव्यात श्रीमंत पर्यटक पाहिजेत आणि ‘सनबर्न ‘ई.डी.एम्.’सारखे (इलेक्ट्रॉनिक संगीतावरील नृत्य) महोत्सव झाल्यासच हे शक्य  !  मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री

‘संस्कृतीरक्षण केले, तर ईश्‍वर नक्कीच साहाय्य करेल आणि आर्थिक संकटही टळेल’, असा विश्‍वास का नाही ?

भगवती, दवर्ली (मडगाव) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने झेंडा लावल्याने तणाव !

मंदिर परिसरात ईदचा झेंडा लावणे, हा धर्मांधांचा उद्दामपणाच ! तो काढायला सांगितल्यावर आक्रमण करणारे धर्मांध किती हिंसक आहेत, ते यातून दिसून येते.

(म्हणे) ‘गोव्यासाठी ‘नवीन सकाळ’ निर्माण करू !’ – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ही नवीन सकाळ अजून बंगालमधील जनतेने कधी अनुभवली का ? त्यांनी हिंसाचाराचीच काळी रात्र अनुभवली !

ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या शॅकधारकांची अनुज्ञप्ती रहित होऊ शकते ! – जिल्हाधिकारी

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा मासिक अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर करावा.  यामध्ये कायद्याचे उल्लंघन करणार्‍या संबंधित शॅकमालकाचे नाव आणि पत्ता असावा, असेही ते म्हणाले.  

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात पणजी येथे इस्कॉनच्या वतीने निषेध मोर्चा

गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !

गोवा ‘विकासाचा आदर्श नमुना (मॉडेल)’  म्हणून ओळखला जाणार !  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने गोमंतकियांशी साधला संवाद

भाजप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगू शकतात !  देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा दावा

भाजप लवकरच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगून त्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमू शकतात, असा दावा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देहली येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणाकडे (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर

दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते.