दीपावलीला नरकासुराला अधिक महत्त्व न देता भगवान श्रीकृष्णाच्या पूजनाला अधिक महत्त्व द्यावे ! – सुदिन ढवळीकर, आमदार, ‘मगोप’

दीपावली सण साजरा करतांना नरकासुराला अधिक महत्त्व न देता जगण्याचा मंत्र देणार्‍या श्रीकृष्णाच्या पूजनाला अधिक महत्त्व द्यावे. मानवतेचे शिक्षण, धर्म, संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यासाठी युवकांनी संघटित होणे आवश्यक आहे.

नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य

राज्य आर्थिक संकटात असतांना नरकासुराच्या प्रतिमांवर पैसा खर्च करणे; म्हणजे नरकासुराच्या प्रतिमेसमवेत तो पैसा जाळल्याप्रमाणेच आहे !

वासुदेवनगर, डिचोली येथे पिस्तुलातून सुटलेल्या गोळीमुळे बालकाचा गेला बळी

खेळता-खेळता सर्व्हिस पिस्तुलातून अचानक सुटलेली गोळी तोंडात घुसल्याने मिहीर वायंगणकर या ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला.

(म्हणे) ‘मी जन्माने हिंदु आहे आणि मला भाजपने हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही !’  ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विविध मंदिरे आणि तपोभूमी यांना भेट

गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मला राज्यपालपदावरून हटवण्यात आले !

घरोघरी शिधावाटप करण्याची गोवा सरकारची योजना अव्यवहारिक होती. सरकारला पैसे चारणार्‍या एका आस्थापनाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेससहित अनेक पक्षांनी माझ्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नाेडा, पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन

विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.

पणजी येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे

‘हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा’, असे आवाहन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने २७ ऑक्टोबर या दिवशी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे…

युवक कौशल्यपूर्ण झाल्यास गोवा स्वयंपूर्ण होईल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्याचा शैक्षणिकदृष्ट्या विकास करतांना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध  आहेे. त्यासाठी सरकार खासगी आस्थापनांच्या सहकार्याने कौशल्यपूर्ण युवावर्ग सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कौशल्ये आत्मसात करून युवावर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिल्यास स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न पूर्ण होईल…

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी माझ्या विधानांचा उपयोग करू नये !  सत्यपाल मलिक, माजी राज्यपाल, गोवा

माझ्या विधानांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी उपयोग करू नये, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

सेवेत कायम करा ! – शारीरिक शिक्षकांची धरणे आंदोलनाद्वारे मागणी

राज्यातील विविध शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या शारीरिक शिक्षकांनी (फिजिकल ट्रेनिंग टिचर) ‘सेवेत कायम करावे’, यासाठी पणजी येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.