‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाकडून सरकारला निर्देश

‘कला अकादमीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा न मागताच कंत्राट कसे दिले ?’, यावर प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सरकारला दिले आहेत.

वास्को मासळी मार्केटबाहेर पोलिसांचे संचलन (परेड) : बाजारातील व्यापारी आणि विक्रेते यांच्यामध्ये तणावाचे वातावरण

वास्को मासळी मार्केटबाहेरील फळ-भाजी विक्रेत्यांनी दुसर्‍या तात्पुरत्या ‘शेड’मध्ये स्थलांतर होण्यास नकार दर्शवल्याचे प्रकरण

बांबोळी येथील गाडेधारकांना १९ डिसेंबरपर्यंत गाडे (फिरती दुकाने) देण्याचे आमदार टोनी फर्नांडिस यांचे आश्‍वासन : गाडेधारकांचे आंदोलन मागे

बांबोळी येथील पूर्वीचे गाडे अनधिकृत नव्हते आणि गाडेधारकांना नवीन गाडे द्यायचे होते, तर नवीन गाड्यांची सिद्धता झाल्यावर पूर्वीचे गाडे का हटवले नाहीत ?

गोव्यात २० नोव्हेंबरपासून ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ३०० चित्रपट प्रदर्शित होणार

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवात जगभरातील सुमारे ३०० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कोरोना महामारीमुळे हा महोत्सव चित्रपटाचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रदर्शन या पद्धतीने (‘हायब्रीड’ पद्धतीने) होणार आहे.

नायजेरियाच्या नागरिकाकडून ७ लक्ष ४० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

गुन्हे अन्वेषण विभागाने नायजेरियाचा नागरिक आमेची डोनाटस् याला समवेत ७ लक्ष ४० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे. डोनाटस हा उत्तर गोव्यात पार्ट्यांसाठी अमली पदार्थांचा पुरवठा करत असे. त्याच्याकडून ‘एल्.एस्.डी.’ ब्लाट्स, एक्स्टसी टॅबलेट आदी अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत.

‘संजीवनी’ साखर कारखान्याच्या ४ लक्ष चौरस मीटर भूमीचे ‘फॉरेन्सिक’ (न्यायवैद्यकीय) विद्यापीठ आणि कायदा विद्यापीठ यांसाठी हस्तांतरण ! – प्रसाद गावकर, आमदार

विधानसभेतील आश्‍वासनाला सरकारने हरताळ फासल्याचा गावकर यांचा आरोप

गोव्यात वर्ष २०१६ पासून महिलांवर बलात्कार केल्याची एकूण ३८७ प्रकरणे नोंद

केवळ २.३ टक्के घटनांतील आरोपींना शिक्षा होणे हे अन्वेषणाचे अपयश समजायचे कि कायदे कमकुवत आहेत ?

हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील श्री घोगळेश्वर मंदिराच्या समोर ईदच्या निमित्ताने अनधिकृतपणे कमान उभारण्याला स्थानिक हिंदूंचा विरोध

अशा प्रकारे मुद्दामहून हिंदूंची कळ काढणार्‍या धर्मांधांचा उद्दामपणा यातून दिसून येतो. धर्मांधांना विरोध करणार्‍या स्थानिक नागरिकांचे अभिनंदन ! ‘हा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, हिंदुस्थान आहे’, असे हिंदूंनी धर्मांधांना ठणकावून सांगावे !

संजीवनी साखर कारखान्याच्या प्रश्नावरून आमदार सुदिन ढवळीकर आणि प्रसाद गावकर यांचे विधानसभेत ठिय्या आंदोलन

‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत जेवणाच्या सुटीत सभागृहात ठिय्या मांडला. या वेळी सांगेचे आमदार श्री. प्रसाद गावकर यांनीही आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांना पाठिंबा दिला.

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जावरून विरोधकांनी सरकारला केले लक्ष्य !

पत्रादेवी ते काणकोणपर्यंत चालू असलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याविषयी १८ ऑक्टोबर या दिवशी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी प्रश्नोत्तर तासाच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांना धारेवर धरले.